मुंबई : मागील एक महिन्यात राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. त्याचबरोबर शिवसेनेत झालेली बंडखोरी आणि यामध्ये सहभागी असलेल्या आमदार हेदेखील चर्चेत राहिले. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जात राज्यात सरकार स्थापन केले.
नवीन सरकार स्थापन झाले असले तरी अजूनही बंडखोरांच्या चर्चेला पूर्णविराम लागलेला नाही. तसेच या सरकार बाबतचे अजून काही महत्त्वाचे निर्णय हे सर्वोच्च न्यायालयातून यायचे बाकी असल्याने सध्या तरी हे सरकार स्थिर असल्याचे म्हणता येणार नाही. दरम्यान शिवसेनेतील नेते आणि एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार यांच्यामध्ये वेगवेगळ्या कारणावरून आरोप-प्रत्यारोपाची स्पर्धा सुरूच आहे. यानंतर आता शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. त्यांनी रत्नागिरीतील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बंडखोर आमदारांवर टीका केली आहे.
बंडखोरांनी बंड केल्यानंतर सामान्य जनतेचे तसेच विकासाचे कारण सांगून सामान्यांना भरकटवण्याचे काम केले. मात्र हे बंडखोर आमदार वैयक्तिक स्वार्थासाठी तिकडे गेल्याची ती काय यावेळी गीतेंनी केली आहे. सध्या जे काही सुरू आहे ते खूप दुर्दैवी आहे. स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी ज्यांनी शिवसेनेसोबत दगाफटका केला त्यांना याचे नुकसान होणारच आहे. याला पूर्णपणे बंडखोरच जबाबदार राहतील अशी टीका यावेळी अनंत गीते यांनी केली आहे.
पक्षप्रमुख ठाकरेंना दिला सल्ला
ही लोक वैयक्तिक स्वार्थासाठी तिकडे केली आहेत त्यामुळे ते आता परत येणार नाहीत. त्यांना परत बोलावण्याचे प्रयत्नही उद्धव ठाकरे यांनी करू नयेत. जे गेलेत, त्यांना मातीत गाडून टाकू आणि नव्याने शिवसेना उभी करू. बंडखोरांच्या गळ्यात पट्टा बांधला आहे आणि साखळी भाजपाच्या हातात आहे. त्यातला एकही परत येणार नाही” यावेळी गीतेंनी बंडखोर आमदारांवर टीका करत शिवसेना पक्षप्रमुखांनाही सल्ला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :


