औरंगाबाद: आज गुरुवार १० फेब्रुवारी रोजी मनपा प्रशासन अभियंता सखाराम पानझडे यांनी माहिती दिली की औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा अनावरण करण्यासाठी सज्ज असून प्रशासनाने परवानगी दिल्यास सदरील पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम घेण्यात येऊ शकतो, शिवाजी महाराज यांचा पुतळा भोवती सुशोभीकरण पुर्ण झाले आहे.अशी माहिती मनपा प्रशासनाच्या वतीने आज रोजी देण्यात आली आहे.
शहरातील शिवप्रेमी आणि विविध संघटनेच्या वतीने शिवजयंतीच्या दिवशी सदरील पुतळ्याचा अनावरण करण्यात यावे अशी मागणी मनपाकडे करण्यात आली होती. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून प्रशासनाने परवानगी दिल्यास सदर अनावरणाचा कार्यक्रम घेता येऊ शकतो.अशी माहिती मनपा प्रशासनाने आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील क्रांति चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम सुरू होते. तसेच आता या पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून आता अनावरण साठी सज्ज झाला आहे. शहरातील शिवप्रेमींनी शिवजयंतीच्या दिवशी या पुतळ्याचे अनावरण करावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- न्यायालयावर तुमचा विश्वास नाही का? – चंद्रकांत पाटलांचा राऊतांना सवाल
- कर्नाटक हिजाब प्रकरण: शाळेच्या गणवेशाचे पालन करा – यास्मिन निगार खान
- टी -२० सामन्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यास पण मुकणार स्मृती मानधना, जाणून घ्या कारण
- उद्धव ठाकरेंच्या आदेशाने माझ्यावर गुन्हा दाखल – रवी राणा
- पुष्पाची क्रेझ थांबेना! श्रीवल्ली गाण्यावर थिरकली राणू मंडल; व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

