नवी दिल्ली: काल (०९ फेब्रुवारी) अमरावती येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याप्रकरणी महानगपरपालिक आयुक्त प्रवीण अष्टेकर यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी दोन महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. भाजप खासदार नवनीत राणा यांच्या अमरावती मतदार संघात हा प्रकार घडला. याचे पडसात उटत सोमवार १५ फेब्रुवारी पर्यंत अमरावती प्रशासकीय कर्मचारी यांनी संप करण्याचा निर्णय घेतला आहे.
याप्रकरणी नवनीत राणा यांचे पती आणि आमदार रवी राणा यांच्या सोबत दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी युवा स्वाभिमानचे पाच कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे असा आरोप केला. नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशात शाई फेक करण्याच्या अनेक घटना घडल्या परंतु माझ्यावर त्यांनी ३०७ (हत्येचा प्रयत्न) कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. यामागचे राजकारण काय ? असा सवाल त्यांनी केला.
संजय राऊत, अनिल परब, दिलीप वळसे पाटील आणि स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांना फोन करून मला अटक करायला सांगितले. हिम्मत असेल तर संजय राऊत यांच्यावर देखील ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करा असे आव्हान यावेळी राणा यांनी केले.
- VIDEO : कॅच घेताच विराटच्या अंगात अवतरला अल्लू अर्जून, मैदानात श्रीवल्लीवर थिरकला!
- शिवसेनेचे शंभर गुंड माझ्याकडे दगड भिरकावत होते, हे पाहूनही पोलिसांनी काहीच केलं नाही- किरीट सोमय्या
- “कॉंग्रेस मुक्त भारत सोडा, अगोदर कॉंग्रेस मुक्त भाषण करून दाखवा”, यशोमती ठाकूर यांचे मोदींना आव्हान
- ‘पाचही राज्यात भाजपची नव्हे, असंतोषाची लाट’; विजय वडेट्टीवार यांची टीका
- हॉकी प्रो लीग: भारतीय संघाने उडवला १०-२ ने आफ्रिकेचा धुव्वा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

