Share

टी -२० सामन्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यास पण मुकणार स्मृती मानधना, जाणून घ्या कारण

Published On: 

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघातील तडाखेबाज सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना न्यूझीलंड विरुद्धच्या एकमेव टी-२० सामन्यात खेळू शकली नव्हती. न्यूझीलंड विरुद्ध झालेलया एकमेव टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा १८ धावांनी पराभव झाला होता. न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाने भारतीय महिला संघासमोर १५५ धावांचे लक्ष ठेवले होते. परंतु भारतीय महिला क्रिकेट संघाला १५५ धावांचा पाठलाग करताना १३७ धावांपर्यंतच मजल मारता आली.

न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या एकमेव टी-२० सामन्यात पराभव झाल्याने भारतीय महिला क्रिकेट संघाने मालिका गमावली. स्मृती मानधना एमआयक्यू (मॅनेज्ड आयसोलेशन अँड क्वारंटाईन – MIQ) मध्ये असल्यामुळे ती न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या एकमेव टी-२० सामन्यात खेळू शकली नाही, अशी माहिती भारतीय संघाची सलामीवीर यस्तिका भाटियाने न्यूझीलंडविरुद्धच्या एकमेव टी-२० सामन्यानंतर दिली. स्मृती मानधना बरोबरच वेगवान गोलंदाज मेघना सिंग आणि रेणुका सिंग या पण एमआयक्यू (मॅनेज्ड आयसोलेशन अँड क्वारंटाईन – MIQ) असल्याचीही माहिती यस्तिका भाटियाने दिली आहे.

भारतीय महिला संघातील तडाखेबाज फलंदाज स्मृती मानधना आता पहिल्या एकदिवसीय सामन्यास मुकणार आहे एवढे नक्की झाले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका १२ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत खेळवली जाणार आहे. स्मृती मानधना,मेघना सिंग आणि रेणुका सिंग या तिघी जणी भारतीय संघाबरोबरच न्यूझीलंड दौऱ्याकरता रवाना झाल्या होत्या, तरी या तिघी जणांचा एमआयक्यू कालावधी का वाढवला आहे ? याच कारण मात्र अद्याप समजू शकलं नाहीये.

      महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!