औरंगाबाद : सर्वसामान्य माणसाला जर साधा उत्पन्नाचा दाखला मिळत नसेल तर शिवसैनिकांना सर्वसामान्य माणसांच्या वेदना जाणून घेतल्या पाहिजे. आणि त्या तेवढ्याच ताकदीने सोडविल्या पाहिजे. शिवसेनेची ही छत्री सर्वसामान्य माणसाला छत्र देणारी, संरक्षण देणारी असली पाहिजे असे आवाहन करत हे शिवसेनेचे छत्र सदैव सर्वसामान्य माणसासाठी राहील असे अभिवचन आमदार अंबादास दानवे यांनी दिले.
शिवसंपर्क मोहिमेदरम्यान शेतमजुरी करणाऱ्या महिलांना सेवाव्रत म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांच्या सौजन्याने आ. दानवे यांच्या हस्ते पावसाळी छत्रीचे वाटप कन्नड सोयगाव मतदारसंघातील बनोटी येथे (दि. ३१) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदयसिंग राजपूत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे, तालुकाप्रमुख केतन काजे आदींची उपस्थिती होती.
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ११ ते ३१ जुलै दरम्यान राज्यभरात शिवसंपर्क मोहिम राबविण्यात येत आहे. शनिवारी जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंनी कन्नड तालुक्यात असलेल्या नागद, बनोटी, शेलगाव, करंजखेड, पिशोर, कन्नड, अंधानेर याठीकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निहाय बैठका घेऊन शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना आमदार अंबादास दानवे म्हणाले की, आपल्याला संघटन मजबूत करायचे आहे.
त्यामुळे शिवसेनेचे स्वबळ वाढविण्यासाठी आणखी आग्रही सर्व शिवसैनिकांनी राहिले पाहिजे असे आवाहन अंबादास दानवे यांनी केले. यावेळी आमदार उदयसिंग राजपूत म्हणाले की, पक्षाची ताकद काय असते ती आपल्या एकजुटीतून दिसून येते. आपण केलेल्या कामाची पक्ष नक्कीच दखल घेतो. याचा अनुभव प्रत्येक शेतकऱ्यांना, शिवसैनिकाना शिवसेनेच्या विविध विकासकामावरून दिसून येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती विकासासाठी शिवसेनेसोबत राहावे असे आवाहन राजपूत यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राची चिंता वाढली ; पुरंदर तालुक्यात आढळला झिका विषाणूचा पहिला रुग्ण
- ‘ठाकरेंनी भूमिपूजन केलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची वर्क ऑर्डर आमच्या सरकारच्या काळातील’
- पनवेलमध्ये प्रसाद लाड यांच्या पुतळ्याचे दहन, सुरक्षा वाढवली
- धनंजय मुंडेंच्या ताब्यातील परळी पालिकेवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…
- पंतप्रधान नरेंद्र मोदी UNSCच्या बैठकीच्या अध्यक्षपदी विराजमान


