Share

पनवेलमध्ये प्रसाद लाड यांच्या पुतळ्याचे दहन, सुरक्षा वाढवली

Published On: 

मुंबई: भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ‘वेळ आली तर शिवसेना भवनही फोडू’ असे विधान केले होते. यावरूनच भाजप सेना वाद पुन्हा सुरु झाला आहे. आता या वादाने वेगळेच वळण घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान पनवेल येथे आमदार प्रसाद लाड यांच्या पुतळ्याचे  दहन केल्याची माहिती समोर येत आहे. कळंबोली शहरात महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी प्रसाद लाड यांचा निषेध नोंदवत पुतळा जाळण्यात आला. तर त्यांच्याविरोधात घोषणाबाजी देण्यात आली आहे.

दरम्यान प्रसाद लाड यांच्या घर आणि ऑफिसबाहेर साध्या वेशात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. काल रात्री धमकीचे कॉल आल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान १ जुलै संध्याकाळी पक्षाच्या आदेशाने सायन येथे कार्यालयात जिल्हा स्तरीय बैठक बोलवण्यात आल्याची माहिती आहे. नितेश राणे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.मनपा निवडणूक आणि आलेल्या धमकीबाबत पुढची रणनिती ठरणार असल्याचे यावेळी बोलले जात आहे.

दरम्यान प्रसाद लाड त्यांच्या वक्तव्यामुळे सेनेकडून चांगलेच घेरले गेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!