🕒 1 min read
मुंबई- माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. गेली काही वर्ष पक्षातलं महत्व कमी झाल्यानं नाराज असलेले खडसे पक्षांतराच्या तयारीत असल्याच्या बातम्या होत्या. अखेर काल भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत खडसेंनी आपली भूमिका मांडली. गेली 40 वर्ष मी भाजपाचं काम केलं. पक्षानंही मला बरंच काही दिलं. पक्षाच्या नेत्यांवर वा पक्षावर जराही राग नाही. उलट भाजपा सोडताना खंत आहे. मला देवेंद्र फडणवीसांनी छळलं. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं ते म्हणाले.
माझ्यासोबत एकही आमदार, एकही खासदार नाही. स्नुषा रक्षा खडसेही भाजपा सोडणार नाहीत, असं खडसे यांनी स्पष्ट केलं. खडसे उद्या, शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातमीमुळे काल जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
एकनाथ खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. दरम्यान,प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी भाजपसाठी काम केले होते. त्यांच्या कार्याला तोड नाही. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
दरम्यान,या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या खडसेंच्या निर्णयाचे मंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.एकनाथ खडसे हे मोठे अनुभवी नेते आहेत त्यांनी भाजपा या पक्षाला महाराष्ट्रात मोठे केले,विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे, राज्यात अनेक वर्ष ते मंत्री होते असे व्यक्तिमत्त्व जर पक्षात आले तर निश्चित पणे पक्षाची ताकद वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भुजबळ म्हणाले, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार साहेब यांच्यावर अनेक वेळा आरोप केले असले तरी त्या वेळेस एकनाथ खडसे हे विरोधी पक्षात होते आणि टीका करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे आणि ही गोष्ट शरद पवार साहेबांना कळते त्यामुळे आम्ही सर्व जण नाथाभाऊंचे स्वागतच करतो एकनाथ खडसे यांनी जर त्यांच्या भूमिकेत बदल केला असेल किंवा राष्ट्रवादी पक्षाची भूमिका त्यांना पटली असेल तर त्यांचे स्वागतच करावे लागेल त्यांच्यामुळे पक्षाला अधिक फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
- पीक नुकसानीचे पंचनामे ४८ तासात पूर्ण करा, अमित देशमुखांचे आदेश
- केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी ; ३० लाख कर्मचाऱ्यांना ३,७३७ कोटी रुपयांचा बोनस
- शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मुश्रीफ आज नगर दौऱ्यावर; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा
- फक्त खडसेच नाही तर अनेकजण राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक ; जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य
- पैशाचा अवैध वापर होऊ नये म्हणून बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षकांची नेमणूक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
