मुंबई : शिवसेना आणि भाजप नेते व खासदार नारायण राणे यांच्यातील वैर संबंध महाराष्ट्राला ठाऊक आहे. राज्यातील घडामोडींवरून सातत्याने महाविकास आघाडीला लक्ष्य करणाऱ्या नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. त्यांनी तौक्ते चक्रीवादळानंतरच्या मदतीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे.
आता, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंच्या टीकांना चोख प्रत्युत्तर दिलंय. ‘भ्रष्टाचाराचा महामेरू अशी राणेंची ओळख आहे. भाजपनं पनवती म्हणून नारायण राणेंना अडगळीत टाकलेले आहे. त्यांना कावीळ झालेली आहे. त्यामुळे त्यांना सगळीकडे एक सारखंच दिसत आहे. त्यांच्या रूग्णालयातच आरटीपीसीआरसाठी जादा पैसे घेतले जातात,’ असा आरोप देखील विनायक राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा म्हणजे नौटनी असल्याची टीका नारायण राणे यांनी केली. यासोबतच, ‘तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोकणात आले होते. मात्र त्यांनी अजूनही वादळात नुकसान झालेल्या नागरिकांसाठी मदतीची घोषणा केली नाही. फक्त मदत देऊ असं बोलून होत नाही. लगेच दोन दिवसांत तुम्ही पॅकेज जाहीर का केलं नाही ?’ असा सवाल देखील राणेंनी उपस्थित केलाय.
पुढे त्यांनी, ‘मुख्यमंत्री पर्यटकांसारखे फक्त वाळूवर फिरून आले. ते चिवला ला येऊन गेले. माझं तिकडे घर आहे. नारायण राणेंनी घर कसं बांधलं, ते बघायला आले असतील. मला याबाबत माहिती असतं, तर मी घरी थांबलो असतो आणि त्यांना नारळाचं पाणी दिलं असतं.’ असा मिश्किल टोला लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वाझेसारख्या वसुलीप्रकरणांमुळेच लसींच्या जागतिक निविदांना प्रतिसाद नाही ? – भाजप
- ‘या’ कारणामुळे आता काँग्रेस आणणार शिवसेनेला अडचणीत
- पदोन्नतीतील आरक्षणाबाबत काँग्रेसची दुटप्पी भूमिका उघड; भाजपचे टीकास्त्र
- मागासवर्गीय पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यात यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
- ‘उद्धव बेटा, मला तुला भेटायचंय’; …म्हणून मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेचं आर्जव


