मुंबई : पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना 33 टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे 25 मे 2004 च्या सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले होते. मात्र, याच पदोन्नतीच्या वादामुळे काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही पदोन्नीतील आरक्षणावरुन आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. यानंतर, पदोन्नतीच्या जीआरला पुन्हा एकदा स्थगिती देण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले होते.
मात्र, या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस असल्याचं उघड झालं आहे. काँग्रेसने पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याला विरोध केला असून आक्रमक भूमिका घेतली आहे. आता, काँग्रेसची भूमिका ही दुटप्पी असल्याची टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. ते बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘आमच्यामुळे याबाबतच्या निर्णयाला स्थगिती मिळाली असल्याचा दावा काँग्रेस नेते करीत असले तरी या संदर्भातील समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेली भूमिका काँग्रेस नेत्यांनी का मान्य केली? यावरून काँग्रेस नेत्यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे,’ असं केशव उपाध्ये म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- वाझेसारख्या वसुलीप्रकरणांमुळेच लसींच्या जागतिक निविदांना प्रतिसाद नाही ? – भाजप
- ‘राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून मराठा समाजासाठी एकत्र यावे’, खा.संभाजीराजेंचे आवाहन
- बुलडाण्यात खळबळ ; शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न
- मागासवर्गीय पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यात यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
- ‘उद्धव बेटा, मला तुला भेटायचंय’; …म्हणून मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेचं आर्जव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

