मुंबई : राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. त्यामुळे शरद पवार आमचे नेते होऊच शकत नाहीत. महाविकास आघाडी हि केवळ सत्तेसाठी तडजोड आहे, अशी टीका शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केली होती. या विधानाला उद्देशून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.
सुधीर मुनगंटीवार टीव्ही ९ शी बोलताना म्हणाले, शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याची आणि मंत्र्याची नार्को टेस्ट करा, त्यावेळी त्यांच्यातून एकच आवाज येईल, ही युती नकोच, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणं म्हणजे राजकीय आत्महत्या आहे, अनंत गीते हे मनापासून बोलत होते. असेही मुनगंटीवार म्हणाले.
मुनगंटीवार पुढे म्हणाले, बाळासाहेब आज असते तर त्यांनी ही असली शिवसेना कधीचीच विसर्जित केली असती. पुढे बोलताना त्यांनी परभणीचे शिवसेना खासदार बंडू जाधव यांच्या वक्तव्याचाही उल्लेख केला. वेळ आल्यावर माकडीणही आपल्या पिल्लाला पायाखाली घालते, वेळ आली तर आम्हीही राष्ट्रवादीला पायाखाली तुडऊ असे विधान बंडू जाधव यांनी केले होते.
शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते श्रीवर्धन येथे बोलताना म्हणाले होते, राज्यात आपलं सरकार आहे, आपलं कशासाठी म्हणायच तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नाहीत. सरकार आघाडी सांभाळेल, आपली जबाबदारी गाव सांभाळायची आहे, आपण आघाडीचा विचार करायचा नाही, आपपण फक्त शिवसेनेचा विचार करायचा असे गीते म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकारमध्येच महिलांची पिळवणूक करणारे बसलेत, मग गुन्हेगारांना धाक कसा असेल?’
- ‘महिला आयोगाला अध्यक्ष देऊ शकत नाही, तुम्ही काय आमचं नेतृत्व करणार?’
- हिरवे लाडू खाणारे सरकार हिंदूंवर गुन्हा दाखल करते, तर महेबूब शेखला वाऱ्यावर सोडते, मनसेला हल्ला
- महाराष्ट्र पुन्हा हादरला! अमरावतीमधील गर्भवती अत्याचार पीडितेची गळफास घेत आत्महत्या
- राज्यसरकार महिला सुरक्षा विषयात अपयशी, राज्याची परिस्थिती चिंताजनक – अभाविप


