मुंबई: शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधी एकत्र होऊ शकत नाही मग सेना आणि काँग्रेस कशी एकत्र होणार. असे म्हटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. असे विधान सेना नेते अनंत गीते यांनी केले आहे. यावर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी त्यांनी म्हटले आहे की,’मला विषय माहित नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे नेते आहेत. गितेंच्या वक्तव्याशी सरकारचा काहीही संबंध नाही. सरकार उद्धव ठाकरे चालवत आहेत. त्यामुळे सर्वांनीच ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारले आहे. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान अनंत गीते यांनी शरद पवार यांच्यावरही निशाना साधला आहे. शरद पवार हे आमचे नेते होऊच शकत नाहीत. एकत्र येऊन आघाडी सरकार स्थापन करणे म्हणजे सत्तेसाठी तडजोड होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. असे वक्तव्य गीतेंनी केले आहे. यामुळे उपस्थित आघाडी कार्यकर्त्यांच्या भूवया उंचावल्या होत्या. या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
महत्त्वाच्या बातम्या
- भावना गवळी यांच्या संस्थेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचीही ईडीकडून चौकशी ?
- राज्यकर्ते अराजकता माजवत आहेत आणि जनता असहाय्य आहे, न्याय कुणाकडे मागावा ?
- महंत नरेंद्र गिरी प्रकरणात मी दोषी असल्यास मला कायद्याप्रमाणे शिक्षा द्या – आनंद गिरी
- चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले पण दिसू दिले नाही; नाना पटोले यांचा घणाघात
- महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या की हत्या ? पोस्टमार्टमच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

