Share

‘राज्यात आघाडी सरकार असले तरीही आम्ही आघाडी सैनिक नाही आहोत,आम्ही शिवसैनिकच आहोत’

Published On: 

रायगड – गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर यायला लागली असून, आता तीन पक्षातील विसंवाद जाहीरपणे  दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यातच आता माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेच्या एका नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार आरोप केले असून, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.

श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी शिवसेना नेते आणि माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते उपस्थित होते. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना गीते यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. मग जर दोन कॉंग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर मग आम्ही त्यांच्या विचारांचे होणे शक्य नाही. जरी राज्यात आघाडी सरकार असले तरीही आम्ही आघाडी सैनिक नाही आहोत. आम्ही शिवसैनिक आहोत शिवसैनिकच राहणार आहोत असं म्हणत कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.

महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. कोणीही कुठलाही नेता जगाने त्याला कितीही उपाध्या देवो, जाणता राजा बोलो. तो आमचा गुरु होऊ शकत नाही. आमचा गुरु फक्त बाळासाहेब ठाकरेच.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. आघाडीचे नेते आघाडी सभांळतील आपल्याला ग्रामपचांयत, पचांयत समिती, जिल्हा परिषद सभांळायची आहे. उद्या आघाडी तुटलीच तर आपण तटकरेकडे जायचे का, आपण आपल्याच घरी येणार. म्हणून आपल्याला आपला पक्ष बळकट करायचा आहे, आघाडी नाही.

सरकार आघाडीचे आहे शिवसेनेचे नाही. शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे, हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपले सरकार आहे. आपले कशासाठी म्हणायचे तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेचे नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपले गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे, असे गीते म्हणाले.शिवसेना काँग्रेस एकविचाराची होऊ शकणार नाही असे अनंत गीते यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!