Share

काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय- नीलेश राणे

Published On: 

मुंबई : प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर हा वाद क्षमतांना दिसत नाही. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये प्रसाद लाड यांचा चांगलाच समाचार संजय राऊत यांनी घेतला. मात्र, त्या नंतर लगेचच भाजप नेते नीलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. इतकेच नाही तर राणे यांनी सदा सरवणकर यांच्यावरही निशाणा साधलाय.

या संदर्भात नीलेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना खासदार संजय राऊत आणि सदा सरवणकर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, ‘हे काय ऐकतोय मी की संज्या धमकी द्यायला लागलाय, संज्या तू फटाके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत.’

शिवसेना आणि भाजप यांच्यात वारंवार खटके उडत आहेत. अनेकदा तर शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते समोरा-समोर आल्याचे दिसून येत आहे. या वादात आता आणखी भर पडली आहे. प्रसाद लाड यांनी थेट शिवसेना भवन फोडण्याची भाषा केल्यामुळे हा वाद चांगलाच पेटलाय. त्यात आता नीलेश राणे यांनीही उडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!