Share

पुणे शहरात आज ३३३ रुग्ण कोरोनामुक्त, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची भर !

Published On: 

🕒 1 min read

पुणे : या वर्षाच्या मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशात थैमान घातले होते. एप्रिल महिन्यात पुण्यातील स्थिती ही गंभीर बनली होती. दिवसाला सुमारे ७ ते ८ हजार नव्या कोरोना बाधितांची नोंद एकट्या पुणे शहरात केली गेली. यानंतर मे महिन्याच्या अखेरीस दुसरी लाट ओसरू लागली. सध्या दररोज सरासरी २०० ते ४०० कोरोना रुग्णांची नोंद पुणे शहरात केली जात आहे.

कोरोना संसर्ग हा कायम असून हा रोग पूर्णपणे नष्ट होईपर्यंत संकट हे कायम आहे. दरम्यान, आज पुणे शहरात ३३३ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७६ हजार २३५ झाली आहे. तर नव्याने २५६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८७ हजार ४२१ इतकी झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात ६ हजार ६१७ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २८ लाख ८७ हजार ९०६ इतकी झाली आहे. शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार ४१२ रुग्णांपैकी २२१ रुग्ण गंभीर तर ३४१ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर नव्याने ७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ७७४ इतकी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!