मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा संपूर्ण राज्याला अभिमान वाटावा असे काम मुंबई महापालिकेने केले असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. घाटकोपर-मानखुर्द जोड मार्गावरील नवीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला असून या उड्डाणपुलाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, खासदार राहुल शेवाळे, आमदार मनोज कोटक, रईस शेख, आयुक्त इक्बाल सिंह चहल व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असल्यामुळे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. याचदिवशी जनतेच्या हितासाठीच्या कामांचे लोकार्पण होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाचे काम सुरू होते. यापूर्वी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या मार्गाने प्रवास करण्याची इच्छा होत नव्हती. मात्र आता हा उड्डाणपूल झाल्यामुळे रोज या पुलावरून प्रवास करण्याची इच्छा होत आहे.
वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे प्रवासातील अनावश्यक वेळ वाचणार असून वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प उपयुक्त आणि जनहिताचा आहे. जनहिताचे प्रकल्प उभारण्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेचा हातखंडा असून त्याबद्दल एक मुंबईकर म्हणून महानगरपालिकेचा मला नेहमी अभिमान वाटतो. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनांच नव्हे तर संपूर्ण राज्याला अभिमान वाटेल असे काम मुंबई महापालिकेने केले असल्याचे गौरवोद्गार ठाकरे यांनी यावेळी काढले.
महत्त्वाच्या बातम्या
- हातावरील ‘शिवबंधन’ हा जनतेचा विश्वास; त्याला तडा जाईल असे काम करु नका, शिवसंपर्क मोहिमेचा समारोप!
- पुणे शहरात आज ३३३ रुग्ण कोरोनामुक्त, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची भर !
- ‘विमा कंपन्यांवर कडक कारवाई करा’ ; खासदार संभाजीराजे आक्रमक
- सर्व जातीधर्मांच्या लोकांना काँग्रेस कमिटी मध्ये स्थान द्या-बाळासाहेब थोरात
- ‘थापड झापडची भाषा मुख्यमंत्र्यांनी करणे दुर्दैवी’ – दरेकर

