🕒 1 min read
पैठण : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पैठण येथील बसस्थानक चौकात शिवसेनेच्या वतीने ११:३० वाजता माजी जिप सभापती विलास भुमरे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, शहर प्रमुख तुषार पाटील, नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल व डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. हे भाव सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत. नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, राखी परदेशी, माजी तालुका प्रमुख अरुण काळे, माजी उपनगराध्यक्ष संभाजी सव्वाशे, माजी सभापती नंदू पठाडे, शेतकरी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन बापूराव पडुळे, नगरसेवक ईश्वर दगडे, कृष्णा मापारी, सरपंच साईनाथ होरकटे, जगन्नाथ दूधे, गणेश मडके, अमोल जाधव, धोंडीराम वाघे, अमोल धस, रामेश्वर मुंदडा, खुशाल भवरे, बाळासाहेब तट्टू, माणिक खरात,शहादेव लोहारे, विष्णू मिटकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
महत्वाच्या बातम्या
- अखेर शेतकरी आंदोलनावर समलमान खानने सोडले मौन, म्हणाला…
- मध्यम वर्गीयांचा अपेक्षाभंग; आरबीआयकडून पतधोरण जाहीर !
- प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होत असलेल्या नाना पटोले यांना ‘या’ आव्हानांचा करावा लागू शकतो सामना
- पुण्यामध्ये पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर! 93 रुपये प्रति लीटरने होतेय विक्री
- “तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता पण आता मात्र…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
