Share

‘मी असं काहीही बोललेलो नाही’, अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण !

Published On: 

पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याचा प्रयत्न काही पोलीस अधिकाऱ्यांनीच केला होता, असा धक्कादायक खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केल्याने आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. खुद्द गृहमंत्र्यांनी असे विधान केल्याननंतर आता अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याचा पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला होता. चार ते पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला,” असे अनिल देखमुखांनी स्पष्ट केले.

मात्र यानंतर ‘राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, असं काहीही मी बोललेलो नाही. याबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे,’ माझी तोंडी चुकीचे वक्तव्य घालण्यात आले आहे. असा खुलासा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले होते. तो प्रयत्न वेळीच हाणून पाडला गेला,’ असं अनिल देशमुख यांनी म्हटल्याचं वृत्त आज प्रसिद्ध झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला होता, असंही प्रसिद्ध झालं होतं. देशमुख यांना याविषयी विचारलं असता त्यांनी स्पष्ट शब्दांत हे वृत्त फेटाळून लावलं. ‘मी असं काहीही बोललेलो नाही,’ असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!