Share

मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावा आणि मगच पोलीस भरती घ्या; संभाजी ब्रिगेडची मागणी

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार गंभीर नव्हते. महाराष्ट्र सरकारच्यावतीने घेण्यात येणाऱ्या पोलिस भरतीचा निर्णय स्थगित करण्यात यावा तसेच यासंदर्भात मराठा आरक्षणाचा निर्णय आधी मार्गी लावा आणि मगच पोलीस भरती घ्या यासाठी संभाजी ब्रिगेड श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्यावतीने पोलीस भरतीच्या सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न झाल्यात आम्ही संभाजी ब्रिगेडच्यावतीने याविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन छेडू व तद्नंतर निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नास महाविकास आघाडी सरकार पूर्णतः जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्रातील बहुसंख्य आणि मुख्य समाज असणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिलेली आहे. तसेच सदर प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. अशा परिस्थितीमध्ये १६ सप्टेंबर २०२० रोजीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडी सरकारने पोलीस शिपाई भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर निर्णयाचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष नानासाहेब शिंदे, माजी तालुकाध्यक्ष अरविंद कापसे, सुनील ढवळे, गणेश पारे, सागर हिरडे, शिवाजी रोही, मयूरजी आढाव यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!