Share

‘राणेंना शिवसेना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही’

Published On: 

सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले. सिंधुदुर्ग येथे खासदार नारायण राणे यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.

ग्रामपंचायात निवडणुकीत कोकणामध्ये शिवसेनेच्या अस्तित्वाला नख लागले. कोकणामध्ये राणे भाजप वाढवण्यात यशस्वी ठरल्याची ही पावती होती. त्यामुळे राणे यांचे पक्षात वजन वाढल्याचे बोलले जात होते. राज्यातील महाविकास आघाडीने नारायण राणे यांची सुरक्षा कपात केल्यानंतर लगेच केंद्र सरकारने राणेंना सुरक्षा व्यवस्था पुरवली होती. या सगळ्या घटनाक्रमातून राणे भाजपला प्रिय झाल्याचे प्रतीत होत आहे.

कालच्या कार्यक्रमात बोलताना राणे यांनी यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ‘शिवसेना नेहमी चांगल्या कामाला विरोध करतेय. आधी कॉलेज मग एअरपोर्ट चांगल्या प्रोजेक्टला विरोध करायचा, नंतर उदघाटन वेळी यायचं, याला म्हणतात आयत्या बिळावर शिवसेना’, असे म्हणत नारायण राणे यांनी शिवसेनेवर तोफ डागली होती.

यावर शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांनी भाष्य केले आहे. ‘राज्यसभा खासदार नारायण राणे यांना शिवसेनेच्या विरोधात कोणीही किती ताकद दिली, तरी कोकणात राणेंना शिवसेना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही’, असा निर्धार आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. अमित शाह यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी राणेंवर सडकून टीका केली.

‘नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेना संपवू, असं म्हटलं होतं. त्यांनी 10 वर्षे मंत्रिपद घेतलं, मात्र त्यांना ते जमलं नाही. उलट इथून सर्व आमदार शिवसेनेचे निवडून आले’, असा टोलाही वैभव नाईक यांनी लगावला आहे. ‘अमित शाह सांगतात आम्ही समोरुन वार करतो, परंतु मागच्या विधानसभा निवडणुकीत इथे शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात भाजपने उमेदवार उभे केले होते. अशाही परिस्थितीत शिवसेनेने आपला गड कायम राखला आहे’, असे म्हणत नाईक यांनी अमित शाह यांच्याही वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!