🕒 1 min read
लासूर स्टेशन : सरपंचपदी मीना संजय पांडव, तर उपसरपंचपदी संपत सोहनराज छाजेड यांची बिनविरोध निवड झाली. गंगापूर तालुक्यातील सर्वात जास्त मोठी बाजारपेठ असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमदार प्रशांत बंब व गंगापूर पंचायत समितीचे उपसभापती संपत छाजेड यांनी एकत्र लढल्याने सतरा सदस्यांपैकी १६ सदस्य निवडून आले. ही ग्रामपंचायत आमदार व उपसभापती यांच्या ताब्यात सरपंच निवड बिनविरोध पार पडली.
आज ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच पदासाठी मीना संजय पांडव व उपसरपंच पदासाठी संपत सोहन राज छाजेड या दोघांचे एकमेव अर्ज आले. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी बिनविरोध निवडणूक घोषित केली. ग्रामसेवक ढेपले यांनी या वेळी सहकार्य केले.
या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य कल्याण कचरू पवार, मोनिका अशोक सौदागर, गणेश व्यवहारे, जय देव जाधव, सोपान बोरकर, नारायण ठोळे, विकी मढीकर, अमोल शिरसाट, राजू गायकवाड, मयूर जयस्वाल, नितीन काजुने, वसीम मन्सुरी, भगवान गाडे आधी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, पोलीस कॉन्स्टेबल पठाण मनोज नवले आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.
महत्वाच्या बातम्या
- जुन्या भांडणातून वृद्धाचे अपहरण, ८ जणांवर गुन्हा
- ‘गेली तीन दशके पवार साहेब चार खासदारांच्या बळावर पंतप्रधान पदाची स्वप्न बघत आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- दिल्ली सरकारच्या या योजनेमुळे ईलेक्ट्रिक टू-व्हिलर वापरल्यास 22 हजारांची होणार बचत


