🕒 1 min read
अहमदनगर:- ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. कोरोनाचे सावट लक्षात घेता मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला असला तरी जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा असेल त्या ठिकाणाहून बघत या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला होता.
आता, राम मंदिराच्या प्रत्यक्ष निर्माण कार्यास देखील सुरुवात झाली आहे. तर, मंदिर उभं करण्यासाठी लागणार खर्च हा करोडो रामभक्तांमार्फत संकलित केला जात आहे. विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर निर्माण सहयोग अभियान सुरु केले आहे. भाजपने देखील निधी संकलनासाठी सक्रिय सहभाग घेतला असून देशभरात हे अभियान राबविले जात आहे.
दरम्यान, राम मंदिर उभारणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी 1 लाख 333 रूपयांची देणगी दिली आहे. राम मंदिर उभारणीसाठी अनेक दिग्गजांनी देणग्या दिल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाच लाखाचा धनादेश दिला आहे. तर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर निर्माण करण्यासाठी 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक दिलेला आहे. तर, भाजप खासदार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्याकडून राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अमित शाहांनी अभ्यास करून बोलायला हवं होतं; हसन मुश्रीफांचा घणाघात
- ‘गेली तीन दशके पवार साहेब चार खासदारांच्या बळावर पंतप्रधान पदाची स्वप्न बघत आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- दिल्ली सरकारच्या या योजनेमुळे ईलेक्ट्रिक टू-व्हिलर वापरल्यास 22 हजारांची होणार बचत


