🕒 1 min read
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.
मात्र, देशाबाहेरील कलाकारांनी या आंदोलनावर भाष्य केल्यानंतर भारतातील सेलिब्रिटींच्या एका गटाने देशातील एकता जपणं महत्वाचं असल्याचं म्हणत बाहेरच्या सेलिब्रिटींनी यात नाक खुपसू नये अशी समज दिली होती. इंटरनॅशनल पॉप स्टार रिहाना, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांच्यासह माजी अडल्ट स्टार मिया खलिफा हिनं देखील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं होतं.
हे प्रकरण सद्या जगभरात गाजत आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केलेल्या सेलिब्रिटींच्या ट्विटचा आशय सारखाच आहे. हा आशय सारखा असल्याने त्यांना कोणी हे करायला सांगितले का ? असा सवाल सामान्यांमध्ये उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या दबावाखाली सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
यावरून भाजप नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अनिल देशमुखांना कोरोना झालाय, त्याचा परिणाम मेंदूवरही होतो म्हणे. देशमुख जरा आपली योग्यता लक्षात घेऊन बोलत जा. तुमच्या पक्षाचे नेते पद्म विभूषण आहेत, परंतु ज्यांच्याकडे तुमचा ईशारा आहे ते भारतरत्न आहेत. तुम्हाला न ओळखणारे नागपुरातही सापडतील, त्यांचा आदर दुनिया करते’, अशा आशयाचे ट्वीट करत भातखळकर यांनी अनिल देशमुखांवर बोचरी टीका केली आहे.
अनिल देशमुखांना कोरोना झालाय, त्याचा परिणाम मेंदूवरही होतो म्हणे. देशमुख जरा आपली योग्यता लक्षात घेऊन बोलत जा. तुमच्या पक्षाचे नेते पद्म विभूषण आहेत, परंतु ज्यांच्याकडे तुमचा ईशारा आहे ते भारतरत्न आहेत. तुम्हाला न ओळखणारे नागपुरातही सापडतील, त्यांचा आदर दुनिया करते. pic.twitter.com/SXTlYyq0JK
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 8, 2021
महत्वाच्या बातम्या
- बीडमध्ये क्षीरसागरांना दणका, नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे आदेश
- दिल्ली सरकारच्या या योजनेमुळे ईलेक्ट्रिक टू-व्हिलर वापरल्यास 22 हजारांची होणार बचत
- ‘गेली तीन दशके पवार साहेब चार खासदारांच्या बळावर पंतप्रधान पदाची स्वप्न बघत आहे’
- २००२ पासून मला संघर्ष, षडयंत्राचा सामना करावा लागला-धनंजय मुंडे
- लासूरगावातून अडीच लाखांचा 38 किलो गांजा जप्त, गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

