Share

सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनचा आज ७६ वा दिवस आहे. शेतकरी आंदोलनाची दखल आता जागतिक पातळीवर घेण्यात येत असून पॉप स्टार रिहाना व पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे. मात्र या दोन्ही सेलिब्रिटींनी मांडलेल्या भूमिकेनंतर भारतीय क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी ‘भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये ढवळाढवळ करू नये’ अशी एकमुखी भूमिका मांडली.

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने देखील अशीच भूमिका मांडली होती. मात्र यानंतर सचिनला सोशल मीडियावर मोठा विरोध करण्यात येतोय. “आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?” असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकारी रणजीत बागल यांनी केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर पोस्टरबाजी करत हा प्रश्न विचारला आहे. तसेच, या पोस्टरबाजीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ट्विटनंतर विविध शेतकरी संघटनांनी आपला रोष व्यक्त केला आहे. तर काही संघटनांनी तर सचिनला दिलेला भारतरत्न पुरस्कार काढून घेण्याची मागणी केली आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरला विचारला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांची सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर पोस्टरबाजी करत त्याला प्रश्न विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!