मुंबई : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याला दोन दिवस होत नाहीत, तोच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघातच भाजपला खिंडार पाडण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. वैभववाडी नगरपंचायतीतील भाजपच्या सहा नगरसेवकांनी एकाचवेळी राजीनामा दिला असून या नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधलं आहे.
याच वरून आज दिवसभर राजकारण तापल्याचं दिसून आलं. आमदार नितेश राणे व निलेश राणे यांनी शिवसेनेसह नेत्यांवर सडकून टीका केल्याचं दिसून आलं. तर, शिवसेनेला कोकणात उमेदवार तरी मिळावेत म्हणून व्हॅलेंटाईन दिनानिमित्त जुन्या प्रेमाला गिफ्ट दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी हे गिफ्ट स्वीकारावं अशी खिल्ली नितेश राणे यांनी उडवली होती.
दरम्यान, या नगरसेवकांचा पक्ष प्रवेश पार पडला असून शिवसेनेचे नेते, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘आम्ही जर दुसरा मार्ग वापरला असता तरी शिवसेनाच उरली नसती,’ असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं. सामंतांनी या वक्तव्याचा देखील समाचार घेतला आहे.
‘प्रत्येक ट्विटवर प्रतिक्रिया द्यावी, असं मला वाटत नाही. देशाचे गृहमंत्री आल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसैनिकाला दिलेली ही भेट आहे. कुणीही कितीही वल्गना केल्या तरी शिवसेना संपू शकत नाही. शिवसेना समोरच्याला संपवू शकते. हे सिंधुदुर्गातल्या शिवसैनिकांनी करुन दाखवलं आहे’ असं भाष्य उदय सामंत यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आझादांना पराजित करण्यासाठी पवारांनीच ठोकला होता शड्डू, मात्र ते अपयशी ठरले ; वाचा पवारांनी सांगितलेला किस्सा !
- रामजीवी म्हणत आव्हाडांनी उडवली भाजपची खिल्ली !
- काँग्रेस ‘या’ बाबतीत नक्कीच नंबर एकचा पक्ष बनेल; आशिष शेलारांचा टोला
- आंदोलनातूनच देश स्वतंत्र झाला, हे कदाचित मोदी विसरले – राजू शेट्टी
- उद्धवा, अजब तुझे सरकार…देतो म्हणालात दहा हजार, हातावर ठेवले दोन हजार…अजब तुझे सरकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
