Share

रामजीवी म्हणत आव्हाडांनी उडवली भाजपची खिल्ली !

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यसभेला संबोधित करताना त्यांनी कृषी कायद्यावर आपली भूमिका मांडली.देशात काही ठिकाणी आंदोलकांची एक टोळी निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ‘काही बुद्धिजीवी असतात. काही श्रमजीवी असतात. परंतु मागच्या काही काळात आंदोलनजीवी पाहायला मिळत आहेत. देशात कुठेही काहीही झाले तर हे आंदोलनजीवी सर्वात आधी तिथे असतात. कधी पडद्याच्या मागे असतात तर पडद्या पुढे असतात. अशा लोकांना ओळखून आपल्याला त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हे लोक स्वत: आंदोलन करत नाहीत. त्यांची ती क्षमताही नाही. मात्र, एखादं आंदोलन सुरू असेल तर हे लोक तिथे पोहोचतात. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत. ते प्रत्येक ठिकाणी मिळतात’, अशी शेलक्या शब्दांत उपद्रव माजवणाऱ्यांचा मोदींनी समाचार घेतला होता.

आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी म्हटल्याने, त्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर मार्मिक टिपण्णी केली आहे. चेन्नईमध्ये सुरु असलेला पहिला कसोटी सामना आज संपला असून भारतीय संघाला मायदेशात पराभव स्वीकारावा लागला आहे. याचाच संदर्भ घेत आव्हाड यांनी मोदींवर उपरोधिक टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटरद्वारे भाजपल टोला लगावला आहे. ‘आज इंग्लंडकडून झालेला भारताचा पराभव हा भारतीय क्रिकेटला बदनाम करण्यासाठी शिजत असलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचा पुरावा आहे – रामजीवि’, अशा आशयाचे ट्वीट करत टीम इंडियाचा केलेला पराभव हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचं सांगत रामजीवी म्हणून भाजपची खिल्ली उडवली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!