🕒 1 min read
मुंबई : नाना पटोले यांची कॉंग्रेस ‘प्रदेशाध्यक्ष’ पदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हे अधिक आक्रमक असावेत यासाठी काँग्रेस कमिटीचा आग्रह होता. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाना पटोलेंनी काँग्रेसला उत्तुंग यशाच्या शिखरावर पोहोचवण्याचा मानस दर्शवला आहे. ‘राज्यात आम्ही चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहोत ही वस्तुस्थिती मान्य केलीय, पण काँग्रेस हा असा शुन्य आहे ज्याच्या जवळ विश्व निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हा राज्यात क्रमांक एकचा पक्ष होईल,’ असा विश्वास काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
नाना पटोलेंच्या या विधानावर भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी जळजळीत टीका केली आहे. ‘आजपर्यंत काँग्रेस किती नंबरी आहे हे जनतेने पाहिले आहे. अशा नंबरी काँग्रेसला अजून नंबरी करण्याचे काम नवे अध्यक्ष करणार असतील तर वर्षानुवर्षे काँग्रेसने चालवलेला धोकाधडी, भ्रष्टाचार, लबाडीच्या कार्यक्रमातील नंबर त्यांना वरचा नक्की मिळेल,’ असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
काँग्रेसला लबाडीचा नंबर नक्की मिळेल..@BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/Y0KkI5TVlQ
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 9, 2021
महत्वाच्या बातम्या
- चर्चा तर होणारच : आठवलेंची आझादांना ऑफर !
- …म्हणूनच आम्ही ठाकरे सरकारला स्थगिती सरकार म्हणतो; नवनीत राणा बरसल्या
- सर्वसामान्य मुंबईकरांना सोयीची लोकल पकडता येणार ?
- आंदोलनातूनच देश स्वतंत्र झाला, हे कदाचित मोदी विसरले – राजू शेट्टी
- उद्धवा, अजब तुझे सरकार…देतो म्हणालात दहा हजार, हातावर ठेवले दोन हजार…अजब तुझे सरकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
