पुणे : शेतकरी आणि सरकार यांच्यामधली कोंडी अद्याप कायम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करताना कृषी कायद्यां विरोधातील आंदोलनावर मौन सोडलं. देशात आंदोलनजीवी ही नवी जमात उदयास आली आहे. त्यापासून देशातील जनतेने सावध राहायला हवं असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
हे आंदोलनकर्ते वकिलांच्या आंदोलनात असतात, विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही तेच असतात, कधी मागे तर कधी पुढे येऊन ते आंदोलनात सहभागी होतात. वेगवेगळ्या आंदोलनातून ते त्यांचे विचार आणि चुकीच्या, भ्रामक गोष्टी पसरवात,’ असे मोदींनी म्हटले. ‘सर्वच आंदोलनजीवी हे परजीवी असतात,’ असा टोला मोदींनी लगावला आहे.
नरेंद्र मोदींच्या आंदोलनजीवी या शब्द प्रयोगानंतर विरोधी नेत्यांनी त्यांना चांगलंच लक्ष्य केलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील आंदोलनाची आठवण करून देत या आंदोलनांमुळेच देश इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त झाल्याचं सांगितलं आहे.
‘पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत जे व्यक्तव्य केलं ते पंतप्रधानपदाला शोभत नाही. कदाचित पंतप्रधान मोदी देशाची परंपरा विसरले आहेत. महात्मा गांधी यांनी अहिंसक आंदोलनाच्या माध्यमातूनच देश स्वतंत्र केला होता, हे विसरु नका. आंदोलकांची अशी हेटाळणी करत असाल तर हे बरोबर नाही,’ अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- चर्चा तर होणारच : आठवलेंची आझादांना ऑफर !
- …म्हणूनच आम्ही ठाकरे सरकारला स्थगिती सरकार म्हणतो; नवनीत राणा बरसल्या
- सर्वसामान्य मुंबईकरांना सोयीची लोकल पकडता येणार ?
- …अन् जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: सायकल चालवत गाठले कार्यालयात
- उद्धवा, अजब तुझे सरकार…देतो म्हणालात दहा हजार, हातावर ठेवले दोन हजार…अजब तुझे सरकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
