🕒 1 min read
नागपूर: काल (२० फेब्रुवारी) कर्नाटकचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Karnataka CM K.Chandrashekhar Rao) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची मुंबईत भेट घेतली. त्यांच्यात अनेक राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. तसेच राव यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मात्र यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची भेट टाळल्याने अनेक चर्चांना उधान आले. यावरच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतक्रिया दिली आहे.
“आम्ही हे कधीच नाही म्हणालो की, काँग्रेस शिवाय आघाडी बनवायची आहे. जेव्हा ममता बॅनर्जींनी असं सूतोवाच केलं होतं तेव्हा शिवसेना पहिला पक्ष होता ज्यांनी काँग्रेससोबतच नवी आघाडी बनली पाहिजे, असे म्हटले होते. तसेच चंद्रशेखर राव यांच्यामध्ये सर्वांना सोबत घेऊन नेतृत्व करण्याची क्षमता आहे”, असे संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘चांगल्या कामासाठी किंवा देशाच्या विकाससाठी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकत्र येऊन काम करणार असेल तर नक्कीचं लोकशाहीत त्याचे स्वागत झाले पाहिजे. परंतु काही लोकांना या देशाच्या लोकशाहीचा अर्थ समजलेला दिसत नाही असं वाटतंय’
महत्वाच्या बातम्या:
- ” ते म्हणाले होते, मी असे पर्यंत तुझे संघातील स्थान अढळ मात्र..” ; साहाचा गांगुलीबाबत मोठा खुलासा
- “चारीमुंड्या चीत करूनच पाटील नावाचा नाही निघाला तर…”, गुलाबराव पाटलांचे खडसेंना थेट आव्हान
- “महाराष्ट्रावर एखादा थुंकत असेल तर आम्ही त्याची…”, संजय राऊतांचा इशारा
- रिद्धिमान साहाला पत्रकारांकडून धमकीचे मेसेज; फोटो व्हायरल
- “…त्यांच्याकडून शेवटचे हातपाय मारण्याचा प्रयत्न केला जातोय”, संजय राऊतांचा मोदींना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
