मुंबई: भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिद्धिमान साहा याला श्रीलंका दौऱ्यातून वगळण्यात आले आहे.या मुद्द्यावर बोलण्यासाठी एका पत्रकारांने साहाला धमकी दिली आहे. यानंतर साहाने त्याच्या ट्विटरवर काही फोटो पोस्ट केले आहे. यात त्याने पत्रकारितेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रिद्धिमान साहाने (wriddhiman saha) ट्विटरवर या मेसेजचे स्क्रिनशॉट टाकले आहे. ज्यात त्याने खाली लिहले “भारतीय क्रिकेटमधील माझ्या सर्व योगदानानंतर मला एका तथाकथित “आदरणीय” पत्रकाराकडून अशा गोष्टीचा सामना करावा लागतो! इथेच पत्रकारिता गेली आहे.” रिद्धिमान साहाच्या या पोस्टमध्ये त्याने पत्रकाराचे नाव सांगितलेले नाही. मात्र चाहते पत्रकारबद्दल अनेक तर्कवितर्क लावत आहेत.
After all of my contributions to Indian cricket..this is what I face from a so called “Respected” journalist! This is where the journalism has gone. pic.twitter.com/woVyq1sOZX
— Wriddhiman Saha (@Wriddhipops) February 19, 2022
साहा सोबत झालेल्या या प्रकरणानंतर नवीन वादाला तोंड फुटले आहे. बीसीसीआय निवड समितीने श्रीलंका मालिकेसाठी संघांची घोषणा केली आणि साहा व्यतिरिक्त, कसोटी विश्लेषक चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनाही संघातून वगळण्यात आले. अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माकडेही निवड समितीने दुर्लक्ष केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…त्यांच्याकडून शेवटचे हातपाय मारण्याचा प्रयत्न केला जातोय”, संजय राऊतांचा मोदींना टोला
- IND vs WI: भारताने केला सलग दुसऱ्यांदा विंडीचा व्हाईट वॉश
- “सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केल्यास एनडीएला…”, रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
- “महाराष्ट्राविषयी द्वेष असणाऱ्या लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेतच बोलावं”, संजय राऊतांचे ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण
- पालकमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का; किसननगरमधील शिवसैनिक भाजपात


