Share

“…त्यांच्याकडून शेवटचे हातपाय मारण्याचा प्रयत्न केला जातोय”, संजय राऊतांचा मोदींना टोला

Published On: 

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Statement) यांनी उत्तर प्रदेश येथे प्रचार सभेला अहमदाबाद बाँबस्फोट प्रकरण थेट समाजवादी पार्टीचं निवडणूक चिन्हं सायकलशी जोडण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांना मोदींच्या वक्तव्याबाबत विचरले असता, अगोदर ते मिश्किलपणे हसले आणि म्हणाले की, “ही तर त्यांची सवय आहे. ही सवय त्यांची मजबूरीसुद्धा आहे. हे लोक जेव्हा पराभवाच्या काठावर उभे असतात तेव्हा ते अशा प्रकारचे आरोप करत असतात. उत्तर प्रदेशात भाजप हरत आहे. त्यामुळे शेवटचे हातपाय मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. या देशातली लोकशाही संपत चालली आहे, त्याचा हा परिणाम आहे.”

काय म्हणाले होते मोदी?

नरेंद्र मोदी यांनी लखीमपुर येथे प्रचार सभेत म्हटले की, “कदाचित पहिल्यांदाच अतिरेक्यांनी असा बाँबस्फोट केला असेल. तिथे खूप लोक मारले गेले. पण यांनी काय केलं तर येथे समाजवादी पार्टीचं निवडणूक चिन्हं आहे, त्या सायकलवर बाँब ठेवण्यात आले होते. आणि जेथे लोक भाजीपाला वगैरे विकत घेण्याासाठी येतात तेथे या सायकल पार्क करण्यात आल्या होत्या. आणि एकाच वेळेस सायकलवर ठेवलेले बाँब चोहोबाजूंनी फुटले. मी हैराण आहे की, अतिरेक्यांनी सायकललाच का पसंद केलं असेल?”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!