🕒 1 min read
मुंबई : यंदा चांगला पाऊस होऊनही मुंबईत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरातील अनेक विभागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार आहे. त्याचे पडसाद मंगळवारी पालिकेच्या स्थायी समिती बैठकीत उमटले. त्यावरील चर्चेत पालिका प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर देण्यात न आल्याने स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली होती. यावर राजकीय वतुर्ळात प्रचंड टीका होत आहे.
भाजपा नेते अतुल भातखळकर यांनीही यावरुन शिवसेनेवर निशाना साधला आहे. भातखळकर म्हणतात, ‘तलावात पुरेसा पाणीसाठा असतानाही मुंबईत ऐन दिवाळीत पाणीटंचाई जाणवत आहे. याला एकमेव कारण म्हणजे सत्ताधाऱ्यांचे गैर व्यवस्थापन आहे. सगळं लक्ष टक्केवारीकडे दिल्यावर हेच परिणाम होणार. कर्मदरिद्रीपणा सोडून सत्ताधारी शिवसेनेने निदान सणासुदीला तरी जनतेचे तळतळाट घेऊ नयेत.’ अशी टीका भातखळकरांनी केली.
तलावात पुरेसा पाणीसाठा असतानाही मुंबईत ऐन दिवाळीत पाणीटंचाई जाणवत आहे.
याला एकमेव कारण म्हणजे सत्ताधाऱ्यांचे गैर व्यवस्थापन. सगळं लक्ष टक्केवारीकडे दिल्यावर हेच परिणाम होणार.
कर्मदरिद्रीपणा सोडून सत्ताधारी शिवसेनेने निदान सणासुदीला तरी जनतेचे तळतळाट घेऊ नयेत. pic.twitter.com/tZZdHb688G— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 3, 2021
ऐन दिवाळीत शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने स्थायी समितीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली आहे. स्थायी समिती बैठकीत पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनास कोंडीत पकडले.
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक ही टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. या चर्चेवर पालिका प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याने त्यावर राजा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच महानगरपालिका प्रशासनाने खुलासा करण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र, प्रशासनाने समाधानकारक खुलासा केला नाही, त्यानंतर सभा तहकुबीचा प्रस्ताव मांडला. त्यास सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी पाठिंबा दिला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही’
- ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री ठाकरे
- देगलूरचा विजय म्हणजे जनतेचा आघाडीवरील विश्वास- नाना पटोले
- पराभवानंतर सुभाष साबने यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
- एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी परिवहनमंत्र्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा – दिलीप धोत्रे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
