🕒 1 min read
मुंबई: विधान परिषद निवडणूक निकालानंतर राज्यातील राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. कोणत्याही क्षणी मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अनेक शिवसेना नेत्यांनी सेनेशी बंड पुकारत आसामला मुक्काम ठोकला आहे. याचा फटका महाविकास आघाडी सरकारलाही बसला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या तसेच मविआ नेत्यांच्या अनेक बैठका सुरु आहेत.
आज (२५ जून) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शिवसेना कुणीही हायजॅक करू शकत नाही. शिवसेना पक्ष आमच्या रक्ताने बनलेला पक्ष आहे. शेकडो लोकांनी यासाठी बलिदान दिले आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत या सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल. या संकटाला आम्ही एक संधी समजतो. शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आज लाखो शिवसैनिक आहेत. पक्ष मजबूत आहे. आजच्या कार्यकारिणी बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होतील .आजची बैठक राजकारण आणि देशाला दिशा देणारी ठरेल.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेण्यात आल्यावरून एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले की, “ते महाराष्ट्राच्या बाहेर आहे. त्यांनी ढुंगणाला पाय लावून राज्यातून पलायन केले आहे. त्यांना आमदार म्हणून सुरक्षा आहे. आमदारांना सुरक्षा असते कुटुंबियांना नाही.”
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : तुम्ही या फंदात पडू नका, तुमच्या नेतृत्वाला धक्का बसेल; संजय राऊतांचा फडणवीसांना सल्ला
- Deepali Syed : “देवा लवकर आटप रे हे सगळं, विरोधकांचा भाव वाढतोय…” – दिपाली सय्यद यांची प्रतिक्रिया
- TMKOC : ‘तारक मेहता…’ मधील अंजली भाभीचे निर्मात्यांवर गंभीर आरोप, म्हणाली…
- Sanjay Raut : “तुम्ही वाघ आहात बकरीसारखे का…”, संजय राऊतांचे बंडखोर आमदारांना आवाहन
- Sanjay Raut : शिवसेना आमच्या रक्तानं बनलेली पार्टी, कोणीही विकत घेऊ शकत नाही – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
