🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. राणेंमुळे पुन्हा एकदा भाजप-सेनेतील वादाचे पडसाद राज्यभर उमटल्याचे पाहायला मिळाले. या दरम्यान शिवसेना-भाजपचे नेते एकमेकांवर वादग्रस्त टीका करत असून वाद आणखी चिघळत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही सलग दोन दिवस ‘सामना’मधून भाजप आणि नारायण राणेंवर टीकेची झोड उठवली आहे. राऊतांनी ट्वीट करतही भाजपवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्रिपदापेक्षा शिवसेना पक्षप्रमुख हेच पद माझ्या दृष्टीने सर्वोच्च पद आहे, असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ते एका विशेष मुलाखतीत बोलत होते. संजय राऊत यांनी सध्या सुरू असलेल्या नारायण राणेंच्या वादासह विविध राजकीय विषयांवर ‘रोखठोक’ भाष्य केलं आहे.
मी नेहमी पक्ष प्रमुखांना वरचढ मानतो. ते मुख्यमंत्री आहेत हा योगायोग आहे. पण शिवसेना पक्षप्रमुख हे आजही सर्वोच्च पद आहे. जसं बाळासाहेब म्हणायचे की शिवसेना प्रमुख हे सर्वोच्च पद आहे. तसं आजही मी मानतो की शिवसेना पक्षप्रमुख हेच सर्वोच्च पद आहे, असं राऊत मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत.
राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. भाजपनं त्यांना सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी ओळखून त्यांनी खात्याचं काम करावं. त्यांना शिवसेनेवर टीका करण्याचा ‘सूक्ष्म’ उद्योग करण्यासाठी केंद्रीय मंत्री केलंय का? राणेंचं ते काम नाही. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचं काम पाहावं, असा सल्ला देत त्यांना खोचक सवालही यावेळी संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजकीय पक्षात मतभेद असतात, पण…’; बापटांनी राणेंचे कान टोचले
- ‘शिवसेना सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात ती शिवसेनाच राहील ,तुम्ही मर्यादा ओलांडली तर..’, राऊतांचा इशारा
- ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार कुठे गेले?’; वरुण सरदेसाईंचा प्रतिसवाल
- ‘आयुष्यात ‘पॉज’ बटण दाबू शकत नाही’; शिल्पा कठीण काळातही राहते आनंदी
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; राज्य सरकार ‘ती’ कागदपत्रे सीबीआयला देणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
