टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीत भाजप – शिवसेनेची युती होणार, असा विश्वास दोन्ही पक्षाचे नेते व्यक्त करत आहेत. पुढील दहा दिवसांत युतीह फॉर्म्युलादेखील निश्चित होणार असल्याची चर्चा आहे. परंतु दोन्ही पक्ष स्वबळाची चाचपणी देखील करत आहेत. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना शिवसेनेत घेत सोलापूर जिल्ह्यात पक्षाने ताकद वाढवली आहे. आता बुधवारी सर्व इच्छुकांच्या मेळाव्याच आयोजन करत स्वबळाचा अंदाज घेतला जाणार आहे. हुतात्मा स्मृती मंदिर येथे शिवसेनेचा मेवाळा पार पडणार आहे.
शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्ष वाढीसाठी इतर पक्षातील नेत्यांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आ दिलीप सोपल, कॉंग्रेसचे माजी आ दिलीप माने, करमाळ्याच्या नेत्या रश्मी बागल, मोहोळमध्ये नागनाथ क्षीरसागर यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ११ पैकी ७ मतदारसंघांवर शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात चर्चा केली जाणार आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे, त्यामुळे सावंत यांच्याकडून पक्षवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत, परंतु बाहेरच्यांना घेत असताना निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची ओरड देखील होत आहे.
महत्वाच्या बातम्या
-
‘शेवटी ते राजे आहेत, आम्ही त्यांची ‘ही’ इच्छाही पूर्ण करू’
-
राणेंच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटलांनी घेतली ‘ही’ भूमिका, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
