Share

‘शेवटी ते राजे आहेत, आम्ही त्यांची ‘ही’ इच्छाही पूर्ण करू’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. त्यानुसार भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाचं लावला आहे.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. त्यांनी ‘पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रवेश व्हावा अशी उदयनराजेंची इच्छा असेल ती देखील पूर्ण होईल शेवटी ते राजे आहेत असं विधान केले आहे. त्यामुळे उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

पुढे बोलताना पाटील यांनी ‘भाजपमध्ये येणारे येतच राहतील. गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात भाजप-शिवसेने बाबत विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे. आपल्या मतदारसंघात विकास व्हावा आपले अजेंडे पूर्ण व्हावे या अपेक्षेने लोक भाजपमध्ये येत आहेत त्यांचं स्वागत आहे. तसेच त्यांचे राजीनामे वगैरे अशा तांत्रिक बाबी लक्षात घेऊन त्यांचे प्रवेश होतील असं विधान पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, ‘जो जो पक्षात येईल त्या सगळ्याचं स्वागतचं आहे. फक्त त्यांच्यावर कुठले गंभीर गु्न्हे दाखल नसावेत, कोणतेही आरोप नसावेत, त्यांना कुठला शब्द दिला जाणार नाही’ असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!