पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडवा सभेनंतर आता पुण्यात चौथी सभा आज रविवार सकाळी ११ वाजता पुण्यात सभा झाली. आज पुण्यात होणाऱ्या सभेला विशेष महत्व प्राप्त झाले होते. राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्याचे जाहीर केले. राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या पुण्यातल्या सभेत त्यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे, शरद पवार या सर्वांवर सडकून टीका केली.
यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांना नाव न घेता टोला लगावला. ‘आज शिवसेनेचं महाविकास आघाडी सोबतचं सरकार पाहून बाळासाहेबांना आनंद झाला असता,’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हंटले होते. याच वक्तव्यावर राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. “शरद पवार असे म्हणतात की, बाळासाहेब आणि मी दिवसा दिवसा भांडायचो आणि आम्ही रात्री एकत्र जेवण करायचो. तुम्ही शरद पवारांसोबत जाऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेची विश्वासार्हता गमावत आहात,” असे राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरे हिंदू असल्याचे वक्तव्य केले होते. यावर पलटवार करताना राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव यांचे हे विधान अगदी पोरकट आहे. ते विचारतात की खरा हिंदू कोण? हे ऐकून मला हसू येतं आणि विचारावंसं वाटतं की, तुझा शर्ट जास्त पांढरा आहे की माझा, असेही राज ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
