Share

IPL 2022 : धोनी तुम्हाला सामान्य माणूस वाटला का..! पुढच्या वर्षीही IPL खेळणाऱ्या ‘माही’बाबत शास्त्रींचं मत!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार असेलल्या महेंद्रसिंह धोनीने पुढील वर्षीही आयपीएल खेळणार असल्याची घोषणा केली आहे. यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. धोनी हा सामान्य खेळाडू नाही आणि तो २-३ महिन्यांचा ब्रेक घेऊन जबरदस्त पुनरागमन करेल असे त्यांनी म्हटले आहे.

महेंद्रसिंह धोनीने स्वतः आयपीएलचा पुढचा हंगाम खेळणार असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला, ”मी नक्कीच खेळेन. याचे कारण सोपे आहे – चेन्नईत न खेळणे आणि धन्यवाद म्हणणे अयोग्य ठरेल. मुंबई एक अशी जागा आहे जिथे मला एक संघ म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून खूप प्रेम आणि आपुलकी मिळाली आहे, परंतु CSKच्या चाहत्यांसाठी ते चांगले होणार नाही.”

ईएसपीएन क्रिकइन्फोवरील संभाषणादरम्यान रवी शास्त्री म्हणाले, ”धोनीने ही घोषणा केली ही चांगली गोष्ट आहे. यामुळे सर्व अटकळांना पूर्णविराम मिळाला. जे घडत होते ते आता होणार नाही. विशेषत: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो भारतातील सर्वोत्तम लीडरपैकी एक आहे. त्याची ही घोषणा CSK चाहत्यांसाठी खूप हृदयस्पर्शी असेल. धोनी हा काही सामान्य खेळाडू नाही. तो २-३महिन्यांचा ब्रेक घेईल आणि परत येईल आणि उत्तम क्रिकेट खेळेल.”

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!