Share

मधू येथे आणि चंद्र तिथे; राणा दाम्पत्यांवर राज ठाकरेंची टीका

Published On: 

पुणे : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी २३ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. या पाश्वर्भूमीवर आज पुण्यातील जाहीर सभेत राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याला जोरदार टोला लगावला. राज ठाकरेंची ही सभा पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित केली होती.

आज पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “गुजरातमध्ये कुणाला माफी मागायला लावणार आहात? हे अचानक आत्ता कसं सुरू झालं? ज्यांना आपलं हिंदुत्व, लाऊडस्पीकर झोंबले, आपल्याविरोधात सगळे एकत्र येतात. अन्यथा भांडत असतात. मी म्हटलं जर मशिदीवर बांग जोरात लागली तर त्याच्यासमोर हनुमान चालीसा लावा. हे राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणायला गेले. ती काय मशीद आहे का? तिथं हनुमान चालिसा म्हणायला. मग त्यांना अटक केली. मधू इथे आणि चंद्र तिथे असं झालं”.

हनुमान चालीसा प्रकरण – 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या भूमिकेला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी समर्थन केले होते. त्यानंतर राणा दांपत्यानी २३ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यापूर्वीच शिवसैनिकांनी राणा दांपत्याच्या घराबाहेर जाम ठोकला होता, हनुमान चालीसा पठन प्रकरणी राणा दाम्पत्याला अटकही करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!