🕒 1 min read
लातूर : मागील आठवडाभरापासून लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील काही गावात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे तसेच नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे, शेतजमिनीचे व इतर नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवावा, जनतेला दिलासा द्यावा असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिककार्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर अमित देशमुख यांनी दिले आहेत.
मागच्या आठवड्यात लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी व त्यातून नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी रविवारी प्रशासनातील अधिकार्यांशी संपर्क करून आढावा घेतला, या काळात औसा, निलंगा, शिरूर आनंतपाळ, उदगीर, जळकोट, देपणी, अहमदपूर रेणापूर, चाकूर, लातूर या दहाही तालुक्यातील काही गावे व परिसरात अचानक अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन व इतर पिकांची नासाडी झाली आहे.
काही ठिकाणी सोयाबीनची झाडावरच उगवण होत आहे. याशिवाय काही ठिकाणी नदीनाल्यांना पाणी आल्याने शेतजमिनीचे नुकसान झालं आहे. शेतातील माती तसेच अवजारे वाहून गेली आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भातील माहिती घेऊन पालकमंत्री ना. देशमुख यांनी निवासी उप जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्याशी चर्चा केली. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवण्यात यावा असे निर्देश दिले आहेत.
मागच्या आठ दिवसात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात मांजरा, रेणा, तावरजा, तेरणा या नद्यांवर उभारलेल्या सर्वच बॅरेजमध्ये पाणी आले आहे. कारसा-पोहरेगाव तसेच खरोळा बॅरेजेसचे दरवाजे वेळेत न उघडल्यामुळे शेतात पाणी जाऊन खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. ह्या दिरंगाई बाबत संबंधितांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश, पालकमंत्री देशमुख यांनी दिले आहेत. पुढचे काही दिवस पावसाचं असल्यामुळे पाटबंधारे विभाग तसेच शेतकऱ्यांनीही या काळात दक्ष राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदीभक्त ‘नटी’ने शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवले
- अतिवृष्टीमुळे पीकाच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा…
- प्रगतशील विचारांची स्वावलंबी पिढी घडवणं, हीच अण्णांना खरी आदरांजली !
- मराठा आरक्षणाच्या विषयात गोंधळ वाढला तर होत्याचं नव्हतं होण्याची वेळही येऊ शकते
- वरुणराजा कोसळणार : पुण्यासह सहा जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
