🕒 1 min read
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याचे वृत्त काल व्हायरल होत होते. यानंतर, मनसे नेत्यांसह खुद्द राज ठाकरेंनी हे वृत्त चुकीचे असल्याचा दुजोरा दिला आहे. राज ठाकरे अलिबाग दौऱ्यावर होते.
राज ठाकरे यांच्या या दौऱ्यात मनसे नेते नितीन सरदेसाई देखील होते. यावेळी त्यांनी रो-रो प्रवास केला. डेकवर त्यांनी मास्क परिधान न केल्याने अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याचे वृत्त काल पसरले होते. मात्र, हे वृत्त खोटे असल्याचे नितीन सरदेसाई यांनी देखील स्पष्ट केलं होत.
आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी देखील यासंदर्भात ट्विट केले आहे. ” राजसाहेबांच्या मुंबई-अलिबाग प्रवासाबाबत दंडात्मक कारवाईची बातमी धादांत खोटी आहे. परंतु बातमीची कोणतीही खातरजमा न करता चुकीचं आणि खोडसाळ वृत्त प्रसिद्ध वृत्तमाध्यमांनीही खुलासा प्रसिद्ध करावा.” असे ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे.
राजसाहेबांच्या मुंबई-अलिबाग प्रवासाबाबत दंडात्मक कारवाईची बातमी धादांत खोटी आहे. परंतु बातमीची कोणतीही खातरजमा न करता चुकीचं आणि खोडसाळ वृत्त प्रसिद्ध वृत्तमाध्यमांनीही खुलासा प्रसिद्ध करावा.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 21, 2020
महत्वाच्या बातम्या :
- मोदीभक्त ‘नटी’ने शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवले
- प्रगतशील विचारांची स्वावलंबी पिढी घडवणं, हीच अण्णांना खरी आदरांजली !
- मराठा आरक्षणाच्या विषयात गोंधळ वाढला तर होत्याचं नव्हतं होण्याची वेळही येऊ शकते
- वरुणराजा कोसळणार : पुण्यासह सहा जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’
- पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवा, अमित देशमुखांचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
