Share

धक्कादायक! साताऱ्यात माजी सरपंचाने केली गरोदर वनरक्षक महिलेला मारहाण

Published On: 

🕒 1 min read

सातारा: सातारा जिल्ह्यातील माजी सरपंच आणि त्याच्या पत्नीने एका गर्भवती वनरक्षक महिलेसह पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संताजपनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होताना दिसत आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे.

नेमके प्रकरण काय?

मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले या कारणातून चिडून वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांनी गर्भवती महिला वनरक्षक सानप यांना मारहाण केली आहे.महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. त्यात धक्कादायक म्हणजे ही वनरक्षक महिला 3 महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या. ही संतापजनक घटना समोर आल्याने मोठी खळबळ माजली आहे.

महिला आयोगाने घेतली दाखल-

दरम्यान घटनेवर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या घटनेची गंभीर दाखल घेतली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. साताऱ्यात पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी एका महिला वनरक्षकास लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला ३ महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या आहेत. याप्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून याबाबत सातारा पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत. असे ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

पाहा व्हिडिओ-

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!