Share

“…असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही”, ‘त्या’ घटनेची आदित्य ठाकरेंनी घेतली दाखल

Published On: 

मुंबई: सातारा जिल्ह्यातील माजी सरपंच आणि त्याच्या पत्नीने एका गर्भवती वनरक्षक महिलेसह पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संताजपनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होताना दिसत आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. दरम्यान पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनीही या घटनेची दखल घेतली आहे.

“आरोपीला आज सकाळी अटक करण्यात आली असून त्याला कायद्याचा कठोरात सामना करावा लागणार आहे. असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही.” असे ट्वीट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

नेमके प्रकरण काय?

मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले या कारणातून चिडून वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांनी गर्भवती महिला वनरक्षक सानप यांना मारहाण केली आहे.महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. त्यात धक्कादायक म्हणजे ही वनरक्षक महिला 3 महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या. ही संतापजनक घटना समोर आल्याने मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही या घटनेची गंभीर दाखल घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!