🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर असे नाव द्यावे अशी मागणी होत असून, मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भावनिक राजकारण खेळते असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर आता शिवसेनेचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
संभाजीनगर हा मुद्दा आमच्यासाठी भावनिक नसून, तो अस्मितेचा मुद्दा असल्याने नामंतर झाले पाहिजे. असे प्रतिपादन अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे. राज्य शासनाने गुंठेवारी नियमितीकरण कायदा मंजूर केल्यानंतर ठाकरे सरकारचे अभिनंदन करीत शिवसेनेतर्फे जल्लोष करण्यात आला. त्यावर आज दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका मांडली.
गुंठेवारी कायदा लागू करण्यासाठी शिवसेनेने सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. त्यावर ठाकरे सरकारने हा घेतला असून, मनपा क्षेत्रातील गुंठेवारीत राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या भूखंडाचे पीआर कार्ड देण्याबाबतही पाठपुरावा करण्यात येत असल्याचे दानवे म्हणाले.
जिल्ह्यात भाजपची सत्ता असतांना, त्यांनी काहीच केले नाही.
चिकलठाणा विमानतळाच्या नामांतरावर खासदार डॉ. भागवत कराड यांनी विमान वाहतूक मंत्र्याची भेट घेतली होती. परंतु त्यावर काहीच झाले नाही. जे भाजपला जमले नाही ते शिवसेनेने करून दाखवले. आता कुठे भाजप जागा झाला आहे. असे म्हणत दानवे यांनी भाजपवर टीका केली.
महत्वाच्या बातम्या
- अजून काय मागणार… सोनू सूद साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत
- ‘पंढरपूर-आळंदी आणि पंढरपूर-देहू रोडला जोडणारा ‘पालखी मार्ग’ बांधला जाणार’
- काँग्रेसकडून राजकारणासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर, आ.नमिता मुंदडा यांचा हल्लाबोल
- नामांतराच्या मुद्द्यावरून अजितदादा भडकले, म्हणाले…
- पुण्यातील शारदा गजानन मंदिरात २५ तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी, घटना CCTV मध्ये कैद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
