🕒 1 min read
औरंगाबाद : जमीन घोटाळयाप्रकरणी शिवसेना मंत्री संदीपान भुमरे (Shiv Sena Minister Sandipan Bhumare) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव आणि न्या. संदिपकुमार मोरे यांनी जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधिक्षक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागालयाला यासंबंधी नोटीस बजावली आहे.
नेमके प्रकरण काय?
मंत्री संदिपान भुमरेसह त्यांचा मुलगा विलास भुमरे आणि नातेवाईकांनी पैठण नगर परिषदेअंतर्गत शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप दत्तात्रय राधाकिसन गोर्डे (Dattatraya Radhakisan Gorde) यांनी केला. याविरोधातच त्यांनी फौजदारी याचिका दाखल केली. यानुसार पैठण नगर परिषदेअंतर्गत शहरात सिटी सर्व्हे क्रमांक १०२६ मधील ५३३.५ चौरस मीटर जमीनीवर मंत्री भुमरे यांनी राजकीय दबावाखाली कब्जा केल्याचे आरोप आहे. या जागेची किंमत तीस कोटी रुपये असून जमिनीच्या पीआर कार्डमध्ये महाराष्ट्र शासनाचे नाव मालकी रकानामध्ये नमूद केलेले आहे. त्यामुळे मंत्री भुमरे यांनी जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान गोर्डे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, विलास संदीपान भुमरे, सोमनाथ परदेशी, ललीता सोमनाथ परदेशी, संजय जगन्नाथ शेळके, राम बाबासाहेब गटकळ, सतिश गोपीनाथ वाघ, योगेश सोमनाथ परदेशी, गोपाल कांतीलाल कायस्थ, करण ईश्वर परदेशी, नामदेव विनायक खराद, गणेश श्रीरंग मडके तसेच, तत्कालिन जिल्हाधिकारी औरंगाबाद, तत्कालीन तहसिलदार (पैठण) यांनी सर्वांनी पदाचा गैरवापर करून शासकीय भुखंड बेकायदेशीररित्या हडप करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 AUCTION: हे काय! यंदा किंग खान नव्हे तर सुहाना आणि आर्यन सांभाळणार ऑक्शनमध्ये केकेआरची मालकी
- “…अन् त्याच्या बंदोबस्तासाठी पोलीस दावणीला बांधले जातात”, रुपाली चाकणकरांचा संताप
- “…भाजपचा हाच दुटप्पीपणा मराठा व ओबीसी आरक्षणासाठी दिसला”, लतादीदी स्मारक वादावरून सचिन सावंतांचा आरोप
- “राष्ट्रवादी राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये हिजाबला परवानगी देणार का?”, भातखळकरांचा सवाल
- “भाजपमुळे हातात पुस्तकांऐवजी दगड, तोंडात पाढ्यांऐवजी जय श्रीराम बोलून..”, कॉंग्रेसचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
