Share

सिल्लोड नगरपरिषदेत शिवसेनेचे वर्चस्व कायम; बिनविरोध पार पडली निवडणूक प्रक्रिया!

Published On: 

औरंगाबाद : सिल्लोड नगरपरिषद विषय समिती निवडणूक प्रक्रिया पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विषय समिती निवडणूक बिनविरोध पार पडल्याने महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे नेतृत्व असलेल्या सिल्लोड नगर परिषदेत शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. सिल्लोड नगरपरिषदेच्या विषय समितीची प्रक्रिया गठीत करण्यासंदर्भात नगरपरिषद सभागृहात सोमवार ( दि. २०) उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली.

निवडून आलेल्या समित्यांमध्ये पदसिद्ध सभापती राजश्री निकम, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती अब्दुल समीर अब्दुल सत्तार, शिक्षण समिती सभापती कल्यानी गौर, स्वच्छता वैद्यक आणि आरोग्य समिती सभापती जुम्मा खा गुलशेर खा पठाण, पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापती सुधाकर प पाटील, नियोजन व विकास समिती सभापती नंदकिशोर सहारे, महिला व बालकल्याण समिती सभापती शबानाबेगम शेख बाबर, महिला व बालकल्याण समिती उपसभापती महेजबीन अकिल यांची निवड झाली.

तर कडूबाई विठ्ठल सपकाळ व मिर्झा चांदबेग उस्मान बेग यांची स्थायी समिती सदस्य पदी निवड झाली. सिल्लोड नगरपरिषद  विषय  समिती  निवडणुकीत सर्व विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी सभापती सदस्यांचे महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, नगराध्यक्षा  राजश्री निकम, युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर आदिंची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!