🕒 1 min read
मुंबई : शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबतीत केलेल्या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी गीते यांनी वैफल्यग्रस्त भावनेतून ते वक्तव्य केल्याचे म्हंटले होते. तसेच सध्या सहनही होत नाही, सांगताही येत नाही अशी गितेंची अवस्था झाली आहे. मात्र अनंत गिते यांच्या बोलल्याने काही फरक पडत नाही असे तटकरे म्हणाले होते.
याच पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलतांना दरेकर म्हणाले की,’अनंत गीते यांचं वक्तव्य झाल्यानंतर रायगडचे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी तातडीने पत्रकारपरिषद घेतली. मला वाटतं यावरून दोन्ही पक्षांमध्ये व सरकारमध्ये काय चाललंय? हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. जर सरकारमध्ये सुसंवाद आहे, सरकारमध्ये समन्वायाचं वातावरण आहे, अशा प्रकारची वक्तव्यं येतात व सारवासरव होते. तेव्हा गीते यांचं वक्तव्यं प्रसार माध्यमांवर आल्यानंतर थोडं देखील थांबायची तयारी राष्ट्रवादी पक्षात दिसत नाही. याचा अर्थ शिवसेनेबरोबर नांदायचं आहे की, शिवसेनेच्या अरे ला कारे करायची भूमिका शिवसेनेने स्वीकारली आहे. ही देखील यामधून स्पष्ट होते’ असेही दरेकर म्हणाले.
पुढे ते म्हणाले की,’शिवसैनिकांचे मत आहे की शिवसैनिक आता कंटाळलेले आहेत. या सगळ्या गोष्टी पक्षाच्यादृष्टने महाराष्ट्रातील जनतेसमोर, येणे अत्यंत आवश्यक आहे. अनंत गीते यांचे व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सहा-सात वेळा खासदार, केंद्रात मंत्री, शिवसेनेचे वरिष्ठ नेते म्हणून काम करत असताना, एकही भ्रष्टाचाराचा डाग, आरोप, टीका या महाराष्ट्रात कुणी केली नाही. बोट दाखवण्या इतकी जागा देखील त्यांनी ठेवली नाही. एवढी चारित्र्यसंपन्नता राज्याच्या राजकारणात काही मूठभर लोकांमध्ये आहे. त्यामध्ये अनंत गीते आहेत. हे मला सांगायला निश्चित अभिमान वाटतो’.
दरम्यान, ‘सुनील तटकरे आपणही अडगळीत होतात. मोदींच्या लाटेत शिवसेनेत काही अंतर्गत फंदफितूरी झाली आणि निसटता विजय आपल्याला मिळाला. राजकारणात यश-अपयश येत असतं. म्हणून पदावरून माणसाची किंमत नसते, तर पद उपभोगत असताना आपली पत आपण काय केली? याचा लेखाजोखा जनता मांडत असते. सुनील तटकरे तुमची पत व अनंत गीते यांची पत, आपण जरी खासदार म्हणून जिंकला असलात तरी निश्चितच अनंत गीते यांची पत आजही पराभूत झाल्यानंतर, कोकणवासीयांच्या मनात निश्चतपणे आहे. हे मला एक कोकणचा सुपूत्र म्हणून आणि मी देखील त्यांच्या हाताखाली कधीकाळी काम केलेलं आहे. हे सांगायला मला अभिमान वाटतो. त्यामुळे चारित्र्याच्या किंवा नेतृत्वाच्या गोष्टी कुणी आणि कशा कराव्यात हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे’ असा टोलाही यावेळी दरेकरांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …त्या सगळ्या गोष्टींच्या वेदना गीते यांच्या वक्तव्यामधून बाहेर आल्या-प्रवीण दरेकर
- राज्यपालांनी ‘ती’ मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक; मुख्यमंत्र्यांचे जशास तसे उत्तर
- आरसीबीचा निळ्या जर्सीद्वारे कोवीड योद्ध्यांना सलाम
- कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांसाठी स्वतंत्र योजना- अजित पवार
- मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा वाचण्याची ती पहिलीच वेळ असेल – राठोड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

