मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांचा घोटाळा बाहेर काढण्याचा सिलसिला सुरू केला आहे. शिवसेनेचे नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. परिवहन विभागातील बदली, पदोन्नतीमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनिल परब यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केलाय.
याप्रकरणी आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात तब्बल १०० कोटी रुपयांचा अब्रुनकसानीचा दावा दाखल केला आहे. आज मंगळवारी परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात हा दावा दाखल केला आहे. अनिल परब यांनी ट्टिटद्वारे ही माहिती दिली. यामुळे सोमय्या यांच्यासमोर अडचण निर्माण झाली आहे.
किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन ७२ तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात मा. उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
— Anil Parab (@advanilparab) September 21, 2021
किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी आणि मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन ७२ तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे असे मंत्री परब यांनी सांगितले.
सोमय्या यांचे आरोप काय?
अनिल परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम करून फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. ‘अनिल परब यांच्यावर ताबडतोब फसवणूक करण्यासाठी मंत्रिपदाचा दुरुपयोग आणि लॉकडाऊनच्या नियमांना डावलून २०२०मध्ये तीनमजली रिसॉर्ट बांधल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे.
अनिल परब यांनी १९ जून २०१९ रोजी पुण्यात राहणाऱ्या विवान साठे यांच्याकडून दापोली-मुरुड समुद्रकिनाऱ्यावर जागा घेतली. १ कोटींमध्ये ही जागा घेतली. खरेदीखत शेतजमीन म्हणून झालं. सगळी कागदपत्रं शेतजमीन म्हणून आहे. पण सातच दिवसांत अनिल परब यांनी २६ जून २०१९ला ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं. जागा अकृषिक असल्याचा दाखला देखील जोडल्याचं म्हटलंय. पण तो दाखला दाखवलेला नाही’
‘७ मे २०२१ रोजी तयार केलेल्या कागदपत्रांत ही जागा अजूनही शेतजमीन आहे. पण आज त्या जागेवर प्रत्यक्षात रिसॉर्ट आहे. कोणतीही परवानगी न घेता, सर्व नियमांची पायमल्ली करून लॉकडाऊनदरम्यान अनिल परब यांनी १० महिन्यांत रिसॉर्टचं बांधकाम पूर्ण केलं. १० मे रोजी मी स्वत: दापोलीला रिसॉर्टवर जाऊन हा घोटाळा उघड केला. ११ मे २०२१ला अनिल परब यांनी बिनशेती जमिनीसाठीचा १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२१ या काळासाठीचा ४ वर्षांचा टॅक्स तलाठीकडे भरला’, असं किरीट सोमय्यांनी सांगितलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- …त्या सगळ्या गोष्टींच्या वेदना गीते यांच्या वक्तव्यामधून बाहेर आल्या-प्रवीण दरेकर
- राज्यपालांनी ‘ती’ मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक; मुख्यमंत्र्यांचे जशास तसे उत्तर
- आरसीबीचा निळ्या जर्सीद्वारे कोवीड योद्ध्यांना सलाम
- कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांसाठी स्वतंत्र योजना- अजित पवार
- मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा वाचण्याची ती पहिलीच वेळ असेल – राठोड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

