औरंगाबाद : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पॉलिटेक्निकला पसंती देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. औरंगाबाद जिल्ह्यात नुकतीच पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची पहिली फेरी १८ सप्टेंबरपासून घोषीत झाली आहे. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावे लागणार आहे. मराठवाड्यातील पॉलिटेक्निकच्या ५६ संस्थांमधील एकूण १५ हजार ९२५ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
दरवर्षी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळत असतो. रोजगार मिळवून देणारा अभ्यासक्रम म्हणून पॉलिटेक्निककडे पाहिले जाते. यंदाही एकूण १५ हजार ९२५ जागांसाठी तब्बल २० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या फेरीची घोषणा १८ सप्टेंबर रोजी झालेली आहे. या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना आता २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच प्रवेश निश्चित करावे लागणार आहे.
पहिल्या फेरीतील यादीत ज्या विद्यार्थ्यांचा पहिल्या ऑप्शनवर नंबर लागला असेल, त्या विद्यार्थ्यांना २२ तारखेपर्यंत प्रवेश करणे अनिवार्य आहे. दहावीनंतर पॉलिटेक्निकला प्रवेश घेतल्यास पॉलिटेक्निकची दोन वर्षे आणि पुढे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो. त्यामुळे इंजिनिअरिंगची चार वर्षे, असे एकूण सहा वर्षात इंजिनिअरिंगची पदविका आणि पदवी अभ्यासक्रम पूर्ण होतो. दहावी नंतर तीनच वर्षात विद्यार्थ्यांना रोजगार, नोकरी मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा याकडे अधिक दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करणार-विजय वडेट्टीवार
- राज्यपालांनी ‘ती’ मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक; मुख्यमंत्र्यांचे जशास तसे उत्तर
- आरसीबीचा निळ्या जर्सीद्वारे कोवीड योद्ध्यांना सलाम
- कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांसाठी स्वतंत्र योजना- अजित पवार
- मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा वाचण्याची ती पहिलीच वेळ असेल – राठोड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

