🕒 1 min read
रत्नागिरी : शिवसेना आणि मनसेत पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरींना सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम केले आहे, असा गंभीर आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रामदास कदम यांना शिवसेनेत किंमत राहिली नसल्याने आपल्या माणसांना पुढे करून स्वतःचे सरकार अस्थिर करण्यासाठी काम करत आहेत. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना मंत्री अनिल परब यांच्याबाबतची दापोलीतील माहिती काढून देण्यासाठी रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे या त्यांच्या माणसाचा वापर केला, असा खळबळजनक आरोपही खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
रामदास कदम यांचे मित्र किरीट सोमय्या यांनी रामदास कदम यांची देखील बेनामी संपत्तीची माहिती जगासमोर आणावी, असं आवाहन देखील वैभव खेडेकर यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट बाबत माहिती उघड केली होती, हे रिसॉर्ट मंत्री परब यांनी बेहिशोबी पैशातून बांधले असल्याचा आरोप करत त्यांनी मंत्री पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांमहाविकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससमोर केली होती.
तसेच रामदास कदम स्वतः आमदार होण्यापूर्वी त्यांची आर्थिक परिस्थिती काय होती व आता त्यांच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता कशी आली याची ईडी मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांना आपल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वापरून रामदास कदम माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांविरोधात मला राजकारणापासून दूर नेण्याचा कट रचत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पालिकेच्या निवडणुकीत समोरासमोर लढून जिंकून दाखवावे, असं आवाहन देखील खेडेकर यांनी दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातील सचिन वाझे कोण’?, भाजपचा सवाल
- मुख्यमंत्रिपदासाठी सोनिया गांधींकडून अंबिका सोनींना हिरवा कंदिल; मात्र आता सोनींचाच नकार
- ..म्हणून ‘माजी’ म्हणू नका; चंद्रकांत पाटलांनी केला ‘त्या’ वक्तव्याचा खुलासा
- ‘मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी मला सॉरी म्हणाल्या’, कॅप्टन अमरिंदर यांचा दावा
- भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
