Share

पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्याला शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने केली मारहाण

Published On: 

यवतमाळ : अस्मानी संकटामुळे नुकसान झेलणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे कोट्यवधी रुपये हडपणाऱ्या विमा कंपन्या बाद कराव्या आणि पिकविम्याची जबाबदारी राज्य सरकारनं घ्यावी अशी मागणी यवतमाळ वाशिम मतदारसंघातील शिवसेना खासदार भावना गवळी यांनी केली आहे.

ईफको टोकियो कंपनीनं यवतमाळ जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे हडप केल्याचा आरोप असून या कंपनीच्या कार्यालयापुढे काल खासदार गवळी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान ईफको टोकियो कंपनीच्या व्यवस्थापकाला मारहाण झाली आहे.

शिवसेनेचे विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांनी व्यवस्थापकाच्या अंगावर सोयाबीन फेकून त्यांना मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना कक्षाबाहेर काढलं. खासदार भावना गवळी यांच्यासमक्षच हा प्रकार घडला.

पीकविमा कंपनीचे अधिकारी थातुरमातूर उत्तरे देत असल्याने शिवसेनेचे संतोष ढवळे संतप्त झाले. त्यांनी अतिवृष्टीमुळे खराब झालेले सोयाबीन कंपनीचे व्यवस्थापक सचिन सुरोशे यांच्या अंगावर फेकून त्यांना मारहाण केली. वेळीच पोलिसांनी धाव घेतल्याने वातावरण निवळले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!